vikas dube ghost

गावकाऱ्यांनी दावा केला की, गँगस्टर विकास दुबेचे भूत रात्री त्याच्या घरावर बसलेले दिसते. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण घरातून बाहेर येत नाही.

पाटणा : बिकरु हत्याकांडात आठ पोलिसांच्या (Police) हत्येनंतर आता गावात विचित्र घटना घडत असल्याचा दावा गावकऱ्यांनी ( villagers) केला आहे. घटनेच्या अडीच महिन्यानंतर आता कुठे दिवसा काही लोक बाहेर दिसतात. पण सायंकाळ होताच गावातील अनेक लोक घरांमध्ये स्वतःला कैद करुन घेतात. याचे कारण ते सांगतात विकास दुबेचे भूत, (Ghost of Vikas Dubey ) गावकाऱ्यांनी दावा केला की, गँगस्टर विकास दुबेचे (Vikas Dubey ) भूत रात्री त्याच्या घरावर बसलेले दिसते. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण घरातून बाहेर येत नाही.

सूर्य मावळताच भयाण शांतता

गावकऱ्यांनी सांगितले की, जसा सूर्य मावळतो, लोक लवकरात लवकर घरी परततात आणि दरवाजे बंद करुन घरात बसतात. आता आधीसारखे लोक दिवसा किंवा सायंकाळी एकमेकांशी बोलत नाहीत. सूर्य मावळताच सगळीकडे एक भयाण शांतता पसरते. बिकरुतील लोक पूर्ण विश्वासाने सांगतात की, लोकांना अजूनही रात्री बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो.

८ पोलिसांची झाली होती हत्या

बिकरु या गावात गँगस्टरकडून आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एन्काऊंटरमध्ये पोलिसांच्या हातून विकास दुबेसहित गावातील सहा लोक मारले गेले होते. गावकऱ्यांनुसार, रात्रीच्या वेळी अजूनही त्यांना गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. काही लोकांनी दावा केला की, त्यांना रात्री विकास दुबेचे भूत पाहिले. त्यांनी हेही सांगितले की, विकास दुबे त्याच्या पडक्या घरात दिसतो.

परदेशातील अवैध मालमत्तांची होणार चौकशी

केंद्रीय सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उत्तर प्रदेशातील गँगस्टर विकास दुबेशी संबंधित अनेक व्यक्तींवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवरुन ईडी या प्रकरणाचा तपास करणार आहे. तपासाची ही सूत्रे कानपूरपासून थायलंडपर्यंत पसरलेल्या अवैध मालमत्तांशी संबंधित आहे. तसे पाहता विकास दुबेच्या खात्यापासूनच ईडीचा तपास सुरु आहे. विकास दुबेच्या अनेक अवैध मालमत्ता ईडीच्या रडारवर आहेत. यासोबतच विकास दुबेशी लागेबांधे असलेले अनेक व्यावसायिक, कंत्राटदारांसह सरकारी अधिकारी व कर्मचारी आता तपास संस्थांच्या रडारवर असून त्यांची चौकशी केली जात आहे.

ईडीच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या यादीत दिनेश तिवारी, शिवम दुबे, अनुराग दुबे, संजय दुबेसह जवळपास तीन डझनपेक्षा अधिक आरोपीविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला असून तपासाची सूत्रे वेगाने हलविली आहेत. लखनौच्या ईडी शाखेने मुख्यालयालाही अहवाल पाठविला आहे.