एका दिवसासाठी मिळाला पोलीस होण्याचा मान, हेल्मेट न घातलेल्या वडिलांचे कापले चालान

उत्तर प्रदेशच्या इटावा(itava) येथे एका दिवसासाठी ‘ठाणेदार’ अर्थात पोलीस (one day police)बनलेल्या मुलीने वडिलांचेच चालान कापले आहे. कर्तव्याची जबाबदारी पार पाडत बीएससीची विद्यार्थी असलेल्या आकांक्षाने एका नवा आदर्श घातला आहे.

इटावा: उत्तर प्रदेशच्या इटावा(itava) येथे एका दिवसासाठी ‘ठाणेदार’ अर्थात पोलीस (one day police)बनलेल्या मुलीने वडिलांचेच चालान कापले आहे. कर्तव्याची जबाबदारी पार पाडत बीएससीची विद्यार्थी असलेल्या आकांक्षाने एका नवा आदर्श घातला आहे. त्यांनी हेल्मेटशिवाय बाजारात दिसलेल्या वडिलांचे चालान कापले. तसेच भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती करू नये, अशा सूचनाही दिल्या. बालिका दिनानिमित्त आकांक्षा गुप्ता यांना इटावाच्या उसरहर पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी पदभार देण्यात आला. एक दिवसासाठी ठाणेदार बनलेल्या आकांक्षा यांनी तक्रारदारांच्या तक्रारींपासून अतिक्रमणापर्यंतच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या पदाच्या जबाबदारीने त्या खूष होत्या.

चूक न करण्याचे वडिलांनी दिले वचन
पोलीस स्टेशनची पाहणी करून आणि सर्व पोलिसांशी ओळख झाल्यानंतर आकांक्षा गुप्ता बाजारात तपासणीसाठी रवाना झाल्या. वाहने तपासत असताना आकांक्षाने तिच्या वडिलांना हेल्मेटशिवाय जाताना पाहिले. आकांक्षाने तातडीने दुचाकी थांबविली आणि चालानच्या सूचना दिल्या. भविष्यात अशी चूक करणार नाही, असे वचनही वडिलांनी दिले. आपल्या कर्तव्याविषयी, आकांक्षा म्हणाल्या की, पोलिसांची कार्यशैली जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. आता मुली समाज आणि देश घडविण्याच्या दृष्टीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्याच्यासमवेत कृती यांनी उपनिरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता.