एक लाख द्या मगच लस घेतो; लसीकरणावरून लोकांमध्ये भय

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे. त्यांच्या गावात 45 वर्षापेक्षा अधिक असलेल्या 10 टक्के लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास नकार दिला आहे. काही लोक लसीचा डोस घेण्यापासून घाबरत आहेत तर काहींना स्लॉट बुक होत नाही. त्यांच्या गावात कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्यामुळे तेथील गावकरी 1 लाख रुपये द्या मग लस घेतो, अशी अजब मागणी करीत आहेत.

  भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे. त्यांच्या गावात 45 वर्षापेक्षा अधिक असलेल्या 10 टक्के लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास नकार दिला आहे. काही लोक लसीचा डोस घेण्यापासून घाबरत आहेत तर काहींना स्लॉट बुक होत नाही. त्यांच्या गावात कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्यामुळे तेथील गावकरी 1 लाख रुपये द्या मग लस घेतो, अशी अजब मागणी करीत आहेत.

  लसीकरणावरून लोकांमध्ये भय

  गावातील लोकांशी बोलल्यानंतर सांगण्यात आले की, याठिकाणी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना ताप आला. त्यामुळे दुसरा डोस घेण्याची भीती लोकांमध्ये आहे तर काही जण म्हणतात ऑनलाईन बुकींगमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेतली नाही. सैत गावचे सदस्य सत्यनारायण तिवारी म्हणाले की, गावातील 4 वृद्धांचा मृत्यू शहरात झाला आहे. परंतु ते नैसर्गिक मृत्यू आहेत. गावातील लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यसेविका सोनम सोनी म्हणाल्या की, जेव्हा गावात 17 मे रोजी लसीकरण सुरू होते. तेव्हा केवळ 4 लोकांनीच लस घेतली. त्यामुळे उर्वरित लसीचे डोस खराब झाले. लसीकरण केल्यामुळे लोकांना ताप येत असल्याची दहशत लोकांच्या मनात आहे. त्यामुळे आम्ही लस घेणार नाही असे गावकरी सांगतात तर काही जण 1 लाख रुपये द्या तेव्हाच लस घेतो अशी अजब मागणीही करत आहेत.

  ना मास्क…ना जगजागृती

  गावात प्रवेश घेताच मंदिराजवळील एका कठड्यावर दोन-ती गावकरी विनामास्क बसल्याचे दिसून आले. नर्मदा नदी किनारी तर काही जण नदीत आंघोळ करत होते तर एकीकडे घराच्या बांधकामाचे काम सुरू होते. त्यांनीही चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते.

  गावकऱ्यांचा गैरसमज

  पहिल्यांदा कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल व्हावे लागले. ज्यांनी लस घेतली होती त्यांना ताप आला. ते आठवडाभर तापातच होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मग रुग्णालयात जाऊन गोळ्या औषधे घ्यायची की पोट भरायचे? त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्याची हिंमत होत नाही असे 70 वर्षीय फूलसिंह कोवट सांगतात.