डिसेंबर 2022 पर्यंत वर्क फ्रॉम होम द्या; आयटी कंपन्यांना आवाहन

कर्नाटक सरकारने राज्यातील आयटी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022 पर्यंत घरातूनच काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉम होम (Work From Home)करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. पण ह्यामागे कोरोना हे कारण नसून बंगळुरू मेट्रोच्या बांधकामामुळे आऊटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारकडून ही विनंती करण्यात आली आहे.

    बंगळुरू : कर्नाटक सरकारने राज्यातील आयटी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022 पर्यंत घरातूनच काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉम होम (Work From Home)करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. पण ह्यामागे कोरोना हे कारण नसून बंगळुरू मेट्रोच्या बांधकामामुळे आऊटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारकडून ही विनंती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने आयटी कंपन्यांनी डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच आणखी वर्षभर आपल्या कर्मचाऱ्यांना घरातच काम करण्यास सांगावे असे सुचवले आहे.

    इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजला (एनएएसएससीओएम) लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बीएमआरसीएल सेंट्रल सिल्क बोर्ड ते केआर पूरमपर्यंतच्या आउटर रिंग रोडवर (ओआरआर) मेट्रोचे बांधकाम सुरू करत आहे. हे मेट्रोचे काम पुढील सुमारे दीड ते दोन वर्षांपर्यंत चालू शकते तर ओआरआरमध्ये अनेक मोठी टेक पार्क आणि आयटी कंपन्यांची कॅम्पस आहेत. त्यामुळे, इथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. सहा लेन आणि सर्व्हिस रोड असून सुद्धा ओआरआर येथील बारमाही होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही मोठी

    कर्नाटक सरकारने यावेळी ही गोष्ट विषत्वाने निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे की, कोरोना महामारीदरम्यान आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याने (डब्ल्यूएफएच) ओआरआरवरील वाहतूक कोंडीपासून थोडा दिलासा मिळाला होता.

    दरम्यान, आता ओआरआरवर (ओआरआर) मेट्रोचे बांधकाम सुरू झाल्यावर आणि विशेषतः आयटी कंपन्यांची कार्यालय पुन्हा सुरू केली तर येथील वाहतुकीचे व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण होऊ शकते. कर्नाटक सरकारने याच संभाव्य स्थितीचा विचार करून आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2022 पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]