हिमालयाच्या कुशीत खुणावताहेत हिमनद्या, उंच हिमालयात बर्फवृष्टीने दिले शुभसंकेत

उंच हिमालयात जोरदार बर्फवृष्टी ( Snowfall ) होत असताना संशोधकांना हिमालयाच्या कुशीतील हिमनद्या खुणावत आहेत. गढवाल क्षेत्रातील गंगोत्री, चौराबाडी, जोशीमठच्या पुढे दूनागिरी, उत्तर काशी क्षेत्रातील ढोकरीयानी हिमनदी यांच्यासह कुमाऊं प्रांतातील पिथौरागढ येथील कासनी हिमनदीवर संशोधक अभ्यास करत आहेत.

हिमनद्यांमध्ये (Himalayas ) झालेल्या बदलाचा अभ्यास वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या (Wadia Institute of Himalayan Geology) संशोधकांनी सुरू केलाय. उंच हिमालयात जोरदार बर्फवृष्टी ( Snowfall ) होत असताना संशोधकांना हिमालयाच्या कुशीतील हिमनद्या खुणावत आहेत. गढवाल क्षेत्रातील गंगोत्री, चौराबाडी, जोशीमठच्या पुढे दूनागिरी, उत्तर काशी क्षेत्रातील ढोकरीयानी हिमनदी यांच्यासह कुमाऊं प्रांतातील पिथौरागढ येथील कासनी हिमनदीवर संशोधक अभ्यास करत आहेत.

दरवर्षी हिमनद्या आकुंचन पावत आहेत. त्यामुळे चांगली बर्फवृष्टी होणे गरजेचे आहे. जेवढे जास्त बर्फ पडेल, तेवढे जास्त नद्यांमध्ये पाणी भरेल. शेतीच्या दृष्टीने हे खूप उपयुक्त ठरेल, असे डॉ. संतोष कुमार राय यांनी सांगितले आहे.

गढवाल आणि कुमाऊंच्या हिमालयीन क्षेत्रातील बर्फवृष्टीवर ऑटोमेटीक वेदर स्टेशनमधून देखरेख केली जात आहे. तज्ञ मंडळी आवश्यक डेटा गोळा करत आहेत. त्याचे परीक्षण करून हिमनद्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकेल.