Golden Mask of Golden Baba in UP

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात सध्या मनोज सेनगर तथा मनोजानंद महाराज चर्चेचा विषय बनले आहेत. कारण असे आहे, की त्यांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चक्क 5 लाख रुपये किमतीचा सुवर्णमास्क बनवून घेतला आहे. असा मास्क उपयोगात आणणारे ते भारतातील पहिलेच असण्याची शक्यता आहे.

    कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात सध्या मनोज सेनगर तथा मनोजानंद महाराज चर्चेचा विषय बनले आहेत. कारण असे आहे, की त्यांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चक्क 5 लाख रुपये किमतीचा सुवर्णमास्क बनवून घेतला आहे. असा मास्क उपयोगात आणणारे ते भारतातील पहिलेच असण्याची शक्यता आहे.

    त्यांचा सुवर्णमास्क अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आहे. या मास्कमध्ये सॅनिटायझिंग द्रवपदार्थ आहे. त्यामुळे कोरोनाचे जंतू या मास्कला चिकटले की त्वरित मरून जातात. त्यामुळे केवळ शुद्ध हवा श्वासावाटे आत घेता येते. हा मास्क न धुता तीन वर्षांपर्यंत वापरता येतो, असा त्यांचा दावा आहे.

    आपल्या मास्कचे नाव त्यांनी ‘शिवशरण मास्क’ असे ठेवले आहे. मनोज सेनगर आपल्या गावात ‘बप्पी लाहिरी ऑफ युपी’ म्हणून ओळखले जातात. त्यांना सोन्याचा अतिशय शौक असून ते अंगावर नेहमी एक किलो वजनाचे सोने बाळगतात. त्यांच्याकडे सोन्याच्या मास्कप्रमाणेच सोन्याचा शंख, सुवर्णमत्स्य आणि सोन्याची मारुतीची मूर्ती असलेले लॉकेटही आहे. त्यांच्या रिव्हॉल्व्हरचे कवचही सोन्याचे असून ते सोन्याचा पट्टा वापरतात. म्हणूनच त्यांना कानपूरचे गोल्डन बाबा म्हणूनही ओळखले जाते.