जम्मू-काश्मीर त्राल येथे बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, ७ जण जखमी; शोधमोहिम सुरू

ग्रेनेडचा हवेतच स्फोट झाल्यानं मोठं नुकसान झालं नाही. स्टँडजवळ उपस्थित सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. सध्या हल्ला झालेलं ठिकाण पूर्णपणे रिकामी करण्यात आलं असून दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

    जम्मू-काश्मीर: त्राल येथील एका बस स्टँडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड बॉम्बनं हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात सातजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याच्या घटनेची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे.

    ग्रेनेडचा हवेतच स्फोट झाल्यानं मोठं नुकसान झालं नाही. स्टँडजवळ उपस्थित सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. सध्या हल्ला झालेलं ठिकाण पूर्णपणे रिकामी करण्यात आलं असून दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

    ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीनं नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात फक्त एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. जखमींवर त्राल येथील एसडीएच रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला श्रीनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.