बारामूलामध्ये CRPF टीमवर ग्रेनेड हल्ला, तीन जवान जखमी

 अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रात्री आठ वाजेच्या सुमारास बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एकाच वेळी ड्रोन दिसले. यापूर्वीच सुरक्षा दलाने एका ड्रोनला पाडून त्यावर लावलेले ५ किलो IED जप्त केले आहे.

    श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या बारामूलामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांना ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात CRPF चे तीन जवान आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रात्री आठ वाजेच्या सुमारास बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एकाच वेळी ड्रोन दिसले. यापूर्वीच सुरक्षा दलाने एका ड्रोनला पाडून त्यावर लावलेले ५ किलो IED जप्त केले आहे.

    दरम्यान रविवारी कुलगामच्या खुदवानी परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कॉन्स्टेबलकडून AK-47 रायफल हिसकाऊन घेतल्याची घटना घडली. तर, मुनंद परिसरात सुरक्षा दलाने चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले.