गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा तडखाफडकी राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री वियय रूपाणी यांनी तडखाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर थोड्याचं वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी तडखाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर थोड्याचं वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच हा मोठा निर्णय घेण्यामागचं नक्की कारण काय आहे, हे आता प्रसार माध्यमांसमोर ते मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितलं की, काळानुसार पक्षातील जबाबदाऱ्या बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायला दिली, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

    पुढे त्यांनी सांगितलं की, जे.पी. नड्डा जी यांचे मार्गदर्शन देखील माझ्यासाठी अभूतपूर्व आहे. आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन. मला जी जबाबदारी देण्यात आली होती. ती मी पार पाडली आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका लढतो आणि 2022 च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.