गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देशात ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या वाढून ती आता 8,848 इतकी झाली आहे. ब्लॅक फंगसची सर्वाधिक 2281 रुग्णसंख्या गुजरातमध्ये असून त्या खालोखाल 2000 रुग्णांसह महाराष्ट्राचा आणि ९१० रुग्णसंख्येसह आंध्र प्रदेशचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ब्लॅक फंगससंबंधी रुग्ण संख्या, तसेच त्यावरील इंजेक्शनची राज्यांना देण्यात आलेली संख्या याची माहिती दिली. संबंधित राज्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त 23,680 व्हायल्स देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली महाराष्ट्रात या रोगाचे 1500 रुग्ण आढळले असून जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला आहे.

    दिल्ली : देशात ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या वाढून ती आता 8,848 इतकी झाली आहे. ब्लॅक फंगसची सर्वाधिक 2281 रुग्णसंख्या गुजरातमध्ये असून त्या खालोखाल 2000 रुग्णांसह महाराष्ट्राचा आणि ९१० रुग्णसंख्येसह आंध्र प्रदेशचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ब्लॅक फंगससंबंधी रुग्ण संख्या, तसेच त्यावरील इंजेक्शनची राज्यांना देण्यात आलेली संख्या याची माहिती दिली. संबंधित राज्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त 23,680 व्हायल्स देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली महाराष्ट्रात या रोगाचे 1500 रुग्ण आढळले असून जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू असतानाच आता ब्लॅक फंगसही विक्राळ रूप धारण करीत आहे. देशात रोज शेकडोंच्या संख्येत नवे रुग्ण समोर येत असून अनेक राज्यांना महामारी घोषित केले आहे. आता मध्यप्रदेश सरकारनेही हा रोग महामारी घोषित केला आहे. आता सरकारने कोरोनाप्रमाणेच रुग्णांवरील उपचार आणि मृतकांची आकडेवारी संकलित करणार असल्याचे म्हटले आहे. कोरोना कोर ग्रुपच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली.

    यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ब्लॅक फंगसला एपिडेमिक डिसिजेस अॅक्ट, 1897 अन्वये महामारी जाहीर करावे असं आवाहन सर्व राज्यांना केले होते. केंद्रीय मंत्रालयाने या संबंधी सर्व राज्यांना एक पत्र लिहिले होते दरम्यान, एखाद्या रुग्णालयाने रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्यास तसेच औषधांचा काळाबाजार होत असल्याचे दिसताच कठोर कारवाईचेही संकेत दिले. राज्यात या रोगाने 10जणांचा बळी घेतला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनाच ब्लॅग फंगसने विळखा घातला आहे.

    फक्त भारतामध्ये कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे उदयाला आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. आता पंतप्रधान याविरोधात लढण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची लवकरच घोषणा करतील.

    - राहुल गांधी, काँग्रेस नेते