गुजरातमधील महिलांना जडलंय दारुचे व्यसन; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या धक्कादायक अहवाल

दारूबंदी असल्याने ड्राय स्टेट अशी ओळख असणाऱ्या गुजरात राज्यात दारू पिण्यात महिलांनी बाजी मारली आहे. गेल्या 5 वर्षांत पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणने हा अहवाल जारी केला आहे.

अहमदाबाद : गेल्या ५ वर्षांत गुजरातमध्ये दारू पिणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट झाली आहे. काही दिवसांपूर्वी देशात सर्वाधिक दारूसेवन होत असलेल्या राज्यांची आकडेवारी जारी करण्यात आली होती. त्यात दारू सेवन करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण नमूद करण्यात आले होते. आता याच संदर्भात अजून एक आकडेवारी जाहीर झाली असून ती गुजरात या राज्याची आहे.

दारूबंदी असल्याने ड्राय स्टेट अशी ओळख असणाऱ्या गुजरात राज्यात दारू पिण्यात महिलांनी बाजी मारली आहे. गेल्या ५ वर्षांत पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणने हा अहवाल जारी केला आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थेने ३३,३४३ महिला आणि ५३५१ पुरुषांचे सर्वेक्षण केले. यामध्ये २०० महिला आणि ३१० पुरुषांनी ते दारू पित असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर २०१५मध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त होते. तसेच २०१५ च्या एनएफएचएस सर्व्हेक्षणादरम्यान ६८ महिला (०.३%) आणि ६६८ पुरुष (११.१%) ने दारू पित असल्याचे स्वीकारले आहे. २०१५मध्ये ६,०१८ पुरुष आणि २२,९३२ महिलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते.

दोन्ही आकड्यांची तुलना केल्यास अशी माहिती समोर आली की, २०१५ मध्ये केवळ ०.१ टक्के शहरी महिलांनी स्वीकारले की त्या दारू पितात. तसेच २०२० च्या सर्व्हेक्षणात ०.३ टक्के महिलांनी दारूचे सेवन केले. २०१५ मध्ये दारू पिणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाणे १०.६ टक्के होते. तसेच २०२० मध्ये हे घसरून ४.६ टक्के झाले. गुजरातमधील ग्रामीण भागात दारू पिणाऱ्या महिलांचे प्रमाण २०१५ साली ०.४ टक्के होते. त्या तुलनेत २०२० यामध्ये ०.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच पुरुषांचे प्रमाण ६.८ टक्क्यांनी घटले आहे.

गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने दारू पिणे हा अपराध समजला जातो. त्यामुळे काही जण दारू पित असल्याचे लपवतात, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गुजरातमध्ये काही समाजात महिला आणि पुरुष एकत्र बसून दारू पिण्याची प्रथा आहे. शिवाय विशिष्ट उत्सवावेळी तेथे दारू पितात. आदिवासी समाजात या प्रथा आजही पाळल्या जातात. त्यामुळे महिलांचे प्रमाण राज्यात असल्याची माहिती समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी यांनी दिली आहे.