Gurugram: CCTV footage shows a man ramming his pick-up truck inside Balaji Hospital premises at Basai Chowk after a tussle between members of the same family

गुरुग्राम : गुरुग्राम येथील एका रुग्णालयात झालेल्या भांडणाचा संपूर्ण राडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रुग्णालयात झालेल्या वादाचा राग काढण्यासाठा एका तरुणाने आपल्या पिकअप गाडीच्या मदतीनं एक-दोन नाही तर तब्बल आठ वेळा रुग्णालयाच्या भिंतीला धडक दिली.

पिकअपने धडक देत त्याने रुग्णालयाची तोडफोड केली आहे. या घटनेमध्ये रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १५ वाहनांचे आणि औषध विभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

बसई चौक परिसरात बालाजी रुग्णालयात दोन वृद्ध व्यक्तींवर उपचार सुरू होते. दोन वृद्ध रुग्णांच्या उपचारांबद्दल कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका व्यक्तीने पिकअप टेम्पोच्या सहाय्याने रुग्णालयाजवळ बांधलेल्या मेडिकल स्टोअरला जोरदार धडक दिली. रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.