हाथरस कांड: पोलिंसाच्या चार्जशीट पेक्षा सीबीआयच्या तपासात वेगळी माहिती; आरोप सिद्ध झाल्यास दोषींना होऊ शकते फाशी

तब्बल चार महिने तपास केल्यानंतर आरोपी संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांनी चारा गोळा करण्यासाठी शेतात जात असताना युवतीवर सामूहिक बलात्कार केला असल्याचे सीबीयाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार करून १९ वर्षीय दलित मुलीच्या हत्याप्रकरणी सीबीयाने चार आरोपींच्या विरोधात आरोपत्र दाखल केले आहे . मृत पीडितेने मृत्यूपपूर्वी दिलेला जबाब व इतर पुराव्याच्या आधारे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोप सिद्ध झाल्यास प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा होऊ शकते अशा अनेक गोष्टींचा आरोपपात्रात उल्लेख आहे.

तब्बल चार महिने तपास केल्यानंतर आरोपी संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांनी चारा गोळा करण्यासाठी शेतात जात असताना युवतीवर सामूहिक बलात्कार केला असल्याचे सीबीयाने म्हटले आहे. सीबीआयने गावातील चार आरोपींवर बलात्कार, खून आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे सादर करत आयपीसी कलम दाखल केले आहे . याशिवाय आरोपींवर अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ सप्टेंबरला हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. अत्याचार करणाऱ्या नराधमांनी तिची जीभदेखील कापली. पीडित तरुणी अनेक दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. या तरुणीच्या मृतदेहावर मध्यरात्री पोलिसांनी तिच्या कुटुंबियांची संमती न घेताच अंत्यसंस्कार केले. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.