एकाच्या गळ्यात घातला हार तर दुसऱ्यासोबत गेली नांदायला; लग्नातला गोंधळ पाहून पोलिसही गोंधळले

उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. एका लग्नात एक नवरी आणि दोन नवरदेव अशी स्थिती निर्माण झाली होती. इथे एका नवरदेवासोबत हार घालण्याचा रिवाज झाला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीची पाठवणी करण्यात आली. यावर पहिल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांना गोंधळ घातला. त्यांनी यावरून थेट पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी नवरी आणि तिच्या वडिलांना व काकांना ताब्यात घेतले आहे.

  लखनौ : उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. एका लग्नात एक नवरी आणि दोन नवरदेव अशी स्थिती निर्माण झाली होती. इथे एका नवरदेवासोबत हार घालण्याचा रिवाज झाला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीची पाठवणी करण्यात आली. यावर पहिल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांना गोंधळ घातला. त्यांनी यावरून थेट पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी नवरी आणि तिच्या वडिलांना व काकांना ताब्यात घेतले आहे.

  काय आहे प्रकरण?

  ही घटना एटा जिल्ह्यातील सिरांव गावातील आहे. इथे एका नवरीच्या मंडपात दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचले. पहिल्या नवरदेवाने नवरीला हार घातला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीचे लग्न लावून देण्यात आले. या प्रकारावरून पहिल्या नवरदेवाकडील लोकांना नवरी आणि तिच्या घरातील लोकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नवरीच्या वडिलांना आणि दुसऱ्या नवरदेवाच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले.

  गावात सगळीकडे चर्चा

  पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. गावात सगळीकडे या घटनेची चर्चा रंगली आहे. जो तो या लग्नाबाबतच चर्चा करत आहे. अनेक लोकांनी सांगितले की, लग्न झालेल्या नवरीचे वयही कमी आहे तर काही लोक म्हणाले की, लग्नाच्या नावावर हा फसवणुकीचा प्रकार आहे.