health workers

केरळच्या(Keral Rural Area) अतिदुर्गम अशा मुरुगुला गावात कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण असल्याचे समजल्यावर आरोग्य कर्मचारी या गावात पोहोचले खरे पण या गावात जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी(Health Workers) पायी रस्ता पार करत आपले कर्तव्य बजावले आहे.

  देशात सगळीकडे कोरोनाने(Corona) थैमान घातले आहे. अगदी दुर्गम भागातही कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. केरळच्या अतिदुर्गम अशा मुरुगुला गावात कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण असल्याचे समजल्यावर आरोग्य कर्मचारी या गावात पोहोचले खरे पण या गावात जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी(Health Workers) पायी रस्ता पार करत आपले कर्तव्य बजावले आहे.

  डीसीसीचे हे आरोग्य कर्मचारी जंगलातून वाट काढत त्या रुग्णांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्यांच्यावर उपचार केले. केरळ सरकारने सर्वच भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, उपचार करण्यासाठी डोमिकिले केअर सेंटर (डीसीसी) सारखी योजना आणली आहे.

  SOS कॉल मिळाल्यानंतर, पुथूर डोमिकिले केअर सेंटर (डीसीसी) मधील वैद्यकीय पथक पलक्कडमधील अटापडीपासून २० किमी अंतरावर असलेल्या आदिवासी भागात असलेल्या इरुला, मुडूगर आणि कुरुंबा जमातीची १०० लोकं असलेल्या गावात पोहोचले. गेल्या आठवड्यात वस्तीतील एका कुटुंबातील तीन जणांना जास्त ताप आला होता आणि त्यांना त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची गरज होती.

  मुरुगुला गावात जाण्याचा मार्ग सोपा नव्हता. आरोग्य पथकाला आपली वाहने  भवानी पुझा नदीच्या काठापर्यंत नेता आली आणि त्यानंतर पायी नदी ओलांडून जावे लागले. शनिवारी सकाळी नदी पार केल्यावर, आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी गावात पोहोचण्यासाठी अटापाडीच्या जंगलातून आठ किलोमीटरचा रस्ता पायी पार केला. तिथे पोहोचल्यावर त्यांनी ३० जणांची कोरोना चाचणी केली. त्यापैकी सात जणांनी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुथूर डीडीसीमध्ये हलविण्यात आले.

  या आरोग्य पथकात असणाऱ्या डॉ. सुकन्या, आरोग्य निरीक्षक सुनील वासू, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक शैज आणि वाहन चालक सादेश यांचे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी फोनवरुन त्यांच्या कामाबद्दल कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

  कोविडचा संसर्ग आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी केरळ सरकारने गेल्या वर्षी करोनाचा उद्रेक झाल्यापासून आरोग्य व्यवस्थेत अनेक अंतर्गत बदल केले आहेत. डीसीसी ही एक नवीन संकल्पना आणली.

  “प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वत:चे डीसीसी असते आणि त्याच्यावर गावातर्फे लक्ष ठेवण्यात येते. पुथुर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ६७ गावे आहेत. रुग्णालयांवरील ओझे कमी करण्यासाठी, डीसीसीसारख्या योजनांचा या भागात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आमच्याकडे पुथुर डीसीसीमध्ये सुमारे १२० बेड आहेत. या सुविधेमुळे आम्ही अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवता येत आहेत, ”असे पलक्कडचे जिल्हा पंचायत नगरसेवक राजन म्हणाले.