Hearing on Shrikrishna Janmabhoomi dispute in Mathura in new year; Petitioners demand removal of mosque in Shrikrishna temple premises

मथुरा : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादावरील सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. आता ७ जानेवारी २०२१ रोजी याप्रकरणी सुनावणी होईल.

गुरुवारी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराच्या आवारातील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

२ ऑक्टोबरला न्यायालयाने याचिका फेटाळली होती. मात्र, नंतर याचिका दाखल करून घेतली होती. श्रीकृष्ण मंदिराच्या संपूर्ण१३.३७ एकर जागेवर मंदिर प्रशासनाने दावा केला आहे.

१० डिसेंबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली होती. श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट १८ नोव्हेंबरला न्यायालयापुढे हजर राहू शकले नाही. त्यामुळे याचिका पुढे ढकलण्यात आली होती.

श्रीकृष्ण जन्मस्थान परिसर सुमारे साडेतेरा एकरचा आहे. यात मंदीर आणि जवळच शाही ईदगाह मशीद आहे. ही मशीद हिंदू मंदिराचा काही भाग पाडून बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

२६ सप्टेंबरला काही भाविकांनी या प्रकरणी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुघल सम्राट औरंगजेबाने १७ व्या शतकात हिंदू मंदिराचा काही भाग पाडून त्याजागी मशीद बांधली होती. मशीद बेकायदेशीर जागेवर असून मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.