हैदराबादमध्ये पावसाचा कहर! जलमय परिस्थितीमुळे लोकांची झाली दयनीय अवस्था, तर भिंत कोसळून ११ जणांचा मृत्यू

हैदराबादच्या (Heavy rainfall in Hyderabad ) अनेक भागांत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंदलागुडा य़ेथील मोहम्मदिया हिल्समध्ये (Mohammedia Hills, Bandlaguda) भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू (death ) झाला आहे. तसेच कोसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झालं (waterlogging and flooding) असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

 हैदराबाद : हैदराबादच्या (Heavy rainfall in Hyderabad ) अनेक भागांत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंदलागुडा य़ेथील मोहम्मदिया हिल्समध्ये (Mohammedia Hills, Bandlaguda) भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू (death ) झाला आहे. तसेच कोसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झालं (waterlogging and flooding) असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.


हैदराबादचे लोकसभा सदस्य असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi)  यांनी ट्विट करत म्हटले की, गेल्या दोन दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बंदलागुडा येथील मोहम्मदिया हिल्समध्ये भिंत कोसळून काही जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुढे म्हणाले की, मी बंदलागुडा येथील मोहम्मदिया हिल्सचं निरिक्षण करत होतो. जेथे भिंत कोसळ्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणं गंभीर जखमी आहेत. त्यानंतर शमशाबादमध्ये अडकलेल्या बस प्रवाशांना माझ्या गाडीतून त्यांना योग्य स्थळी पोहोचवण्यात आले आहे. आता मी तालाबकट्टा आणि यसराब नगर येथील भागात जात आहे.

दुसरीकडे काल मंगळवारी इब्राहिमपटनम भागांत घराचे छप्पर कोसळ्यामुळे एका ४० वर्षीय महिलेची आणि तिच्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाली माहिती मिळाली आहे. त्यानंतर तेलंगानामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येथील अनेक भाग जलमय झाले आहेत. ट्टापुर मेन रोड. मुशीराबाद, टोली चौकी आणि दुम्मीगुडा भागातं पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. एसडीआरएफची टीमने रेस्कयू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. तसेच जवाहरलाल नेहरू टेक्निकल यूनिवर्सिटीमध्ये सुरू असणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

तेलंगानाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सांगितले की, हैदराबादमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढील पावसाची स्थिती काय असणार आहे. याबाबतचा अहवाल मागितला आहे. सध्याच्या घडीला रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.