मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगड कोसळले. तसेच येथील कॅम्पही वाहून गेला. या दुर्घटनेत एकूण आठ मजूर वाहून गेले. तेव्हा स्थानिकांनी यापैकी तीन जणांना वाचवले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तर येथे काम करत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला.

    गंगटोक – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. सिक्कीममधील ममखोला येथे सेवक-रंग्पो रेल्वे योजनेच्या सुरू असलेल्या कामादरम्यान, मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या भूस्खलनामुळे दरड कोसळून अनेक मजूर अडकले. तर काही जण पाणी आणि चिखलासोबत वाहून गेले.

    मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगड कोसळले. तसेच येथील कॅम्पही वाहून गेला. या दुर्घटनेत एकूण आठ मजूर वाहून गेले. तेव्हा स्थानिकांनी यापैकी तीन जणांना वाचवले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तर येथे काम करत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला.

    मृत मजूर हा नेपाळमधील रहिवासी होता. त्याशिवाय दोन अन्य लोकांनाही गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले आहे.