baloon sfot on modi birthday

हेलियमच्या फुग्यांच्या स्फोट झाल्याने भाजपाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. स्फोट होतानाचा व्हिडीओही सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तामिळनाडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ( Modi’s birthday) १७ सप्टेंबर २०२० रोजी होता. त्यामुळे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोदींवर जगभरातूनन शुभेच्छांचा वर्षाव झाले. मात्र तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा (Helium balloon) स्फोट (explodes) झाला आणि यामध्ये ३० कार्यकर्ते जखमी  (30 workers injure)झाले आहेत.


हेलियमच्या फुग्यांच्या स्फोट झाल्याने भाजपाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. स्फोट होतानाचा व्हिडीओही सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला जात होता. या कार्यक्रमासाठी हेलियमच्या २००० फुग्यांचा वापर केला जात होता. हे फुगे कार्यक्रमामध्य़े आकाशात सोडले जाणार होते. परंतु त्यांचा अचानक स्फोट झाल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.