अंत्यसंस्कारानंतर 10 दिवसांनी तिचा पती घरी परतला, काय घडलं नेमकं ? : सविस्तर

राजसमंद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणावर त्याच्या मृत्यूपश्चात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर 10 दिवसांनी तो तरुण घरी परतला यामुळे पत्नीसह नातेवाईक आणि त्यांच्या मुलांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणावर त्याच्या मृत्यूपश्चात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर 10 दिवसांनी तो तरुण घरी परतला यामुळे पत्नीसह नातेवाईक आणि त्यांच्या मुलांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात 11 मे रोजी एका व्यक्तिचे प्रेत सापडले. हे प्रेत येथील आरके जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पोलिसांना या प्रेताची ओळख पटवण्याबाबत सांगितले. प्रेताचा चेहऱ्यावरील जखमांमुळे ओळख पटणे कठीण झाले होते. याच दरम्यान 15 मे रोजी हेड कॉन्स्टेबल मोहनलाल रुग्णालयात आले आणि त्यांनी मृत व्यक्तीच्या छायाचित्राच्या आधारे गावातील ओंकारलाल गाडोलिया लोहार नावाच्या तरुणाच्या भावाला आणि त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयात बोलावले. दरम्यान नातेवाईकांनी ओंकार लालच्या डाव्या हाताच्या तळाव्यापासून कोपरापर्यंत जमखेमुळे झालेल्या खुणेवरून या प्रेताची ओळख पटवली आणि सांगितले की हे प्रेत ओंकारलालचेच आहे. त्यानंतर पोलिसांनी ते प्रेत पोलिसांनी रुग्णालयात ओळख पटवण्याकरिता आलेल्या तरुणाच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नातेवाईक आणि कुटुंबीयांनी मिळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

    दरम्यान याबाबत ओंकारलालचा भाऊ नानालाल गाडोलिया यांनी पोलिसांना सांगितले की, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदन न करताच प्रेत ताब्यात दिले होते. त्यानंतर आम्ही ओंकारलाल गाडोलिया लोहार असे समजूनच भावावर अंत्यसंस्कारही केले होते. गेल्या 10 दिवसांपासून आम्ही त्याच्याकरिता शोक करत आहोत. पण रविवारी सायंकाळी अचानक ओंकारलालला घरी परत आलेला बघून आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्याला धक्का बसला.

    11 मे रोजी घरी कोणालाही न सांगता मी उदयपूरला गेलो होतो. तिथे पोहोचताक्षणी त्यांची तब्येत फारच बिघडली. त्यामुळे एका रुग्णालयात दाखल झाले. ही गोष्ट कोणीही नातेवाईक आणि कुटुंबीयांना सांगितली नाही. त्यांना सांगितलं तर ते घाबरतील असे त्यांना वाटले. 5 दिवसांनंतर रुग्णालयाने तब्येत सुधारल्यामुळे घरी जाण्याचा सल्ला दिला तेव्हा घरी परतलो, अशी माहिती ओंकारलालने दिली. तसेच त्याने पुढे सांगितले की, जेव्हा घरी आल्यावर माझ्या फोटोला हार घातले आहेत, हे बघून त्याला धक्का बसला. तसेच त्याचा भाऊ, मुलं यांनी मुंडन केलं होतं. बायकोला तर धक्काच बसला ती बघून म्हणाली, तुमचं तर निधन झाल्याचं कळालं होतं, मग तुम्ही जिवंत कसे झालात. तेव्हा ओंकारलालने तिला मी तुझाच नवरा आहे, भूत नाही, असे सांगितल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

    आता पोलीस आणि रुग्णालय प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे की, ज्या तरुणावर अंत्यसंस्कार झाले तो नेमका कोण होता? या प्रकरणामुळे राजसमंद येथील आरके रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. प्रेताचे शवविच्छेन न करता अनोळखी व्यक्तिंच्या ताब्यात ते देण्यात आले यामुळे अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तिची ओळख कशी पटवायची हे आव्हान अजूनही पोलिसांसमोर आहे.