कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी करायला लावला नागीण डान्स ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अनेक नागरिक लॉकडाऊन तसेच कोरोना निर्बंधांकडे दुर्लक्ष करुन रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांना धडा शिकवण्यासाठी देशभरातील पोलीस नाविन्यपूर्ण शिक्षेचा अवलंब करताना दिसत आहेत.

    जैसलमेर: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रादुर्भवाचा धोका टाळण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करत , बेफिकरपणे फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी प्रसंगी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत आहेत. तर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद दिल्याचे व्हिडीओ अनेकही सातत्याने व्हायरल होत आहेत. परंतु सध्या राजस्थान मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, त्याची मोठी चर्चा आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील जैसलमेर, इथला आहे. नियम मोडणाऱ्या युवकांना पोलिसांनी शिक्षा म्हणून नागीन डान्स करायला लावल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

    अनेक नागरिक लॉकडाऊन तसेच कोरोना निर्बंधांकडे दुर्लक्ष करुन रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांना धडा शिकवण्यासाठी देशभरातील पोलीस नाविन्यपूर्ण शिक्षेचा अवलंब करताना दिसत आहेत. अशा वैशिष्ठपूर्ण शिक्षांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.