हिंदु महासभेनं उभारलं नथुराम गोडसे अभ्यास केंद्र, सांगितला हा उद्देश

मध्य प्रदेशमधल्या ग्वालियरमध्ये नथुराम गोडसेच्या नावाने एक अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला. या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून तरुण पिढीला स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देण्याचा उद्देश आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत अधिकाधिक माहिती तरुण पिढीला व्हावी आणि याबाबतच्या ज्ञानाचा प्रसार व्हावा, हा या अभ्यास केंद्रामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जातंय.

मध्यप्रदेशमध्ये हिंदू महासभेच्या वतीने नथुराम गोडसे अभ्यास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधल्या ग्वालियरमध्ये नथुराम गोडसेच्या नावाने एक अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला. या अभ्यास केंद्राचं रविवारी अनावरण करण्यात आलं.

याविषयी माहिती देताना हिंदु महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितलं की या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून तरुण पिढीला स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देण्याचा उद्देश आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत अधिकाधिक माहिती तरुण पिढीला व्हावी आणि याबाबतच्या ज्ञानाचा प्रसार व्हावा, हा या अभ्यास केंद्रामागचा उद्देश आहे.

नथुराम गोडसेच्या नावाने हे केंद्र उभं करण्यात आल्यामुळे यावरून आता देशभर चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. नथुराम गोडसे हा कट्टर हिंदुत्ववादी होता. त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची दिल्लीमध्ये गोळ्या घालून हत्या केली. नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ सदस्यदेखील होता.

गोडसेच्या म्हणण्यानुसार भारताचे विभाजन करण्याच्या वेळी महात्मा गांधींनी मुस्लिमधार्जिणी भूमिका घेतली आणि त्यामुळे भारतातील हिंदूंचं नुकसान झालं. हिंदूंवर अत्याचार होत असताना महात्मा गांधींनी त्याकडे डोळेझाक केली आणि मुस्लिमांच्या समर्थनार्थ निर्णय घेतले, असा नथुराम गोडसेचा दावा होता. त्यामुळे नथुराम गोडसे. नारायण आपटे आणि इतर सहा जणांनी महात्मा गांधींची हत्या केली.

याबाबत एक वर्षापेक्षा जास्त काळ खटला चालला आणि ८  नोव्हेंबर १९४९ रोजी  नथुराम गोडसेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.