121 types of mangoes

आंब्याच्या(Mango) १२१ वेगवेगळ्या प्रकारांची(121 Types OF Mangoes On One Tree) एकाच झाडावर लागवड करण्यात आली होती.पाच वर्षापूर्वी केलेल्या या लागवडीचा परिणाम दिसून येत आहे.

    सहारनपूर: उत्तरप्रदेशच्या(Uttar Pradesh) सहारनपूर(Saharanpur) जिल्ह्यातलं एक झाड सध्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनलं आहे. या झाडाचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे. या झाडावर १२१ वेगवेगळ्या प्रजातींचे(121 Types Of Mangoes On One Tree) आंबे येतात. आंब्याच्या नव्या प्रजातीच्या विकासासाठी केलेल्या प्रयोगांमुळे या झाडाला असे आंबे लागले आहेत. पाच वर्षांपूर्वी काही जणांनी मिळून अशा प्रकारच्या झाडाचा प्रयोग केला होता.


    बागकाम प्रयोग आणि प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आंब्याच्या १२१ वेगवेगळ्या प्रकारांची एकाच झाडावर लागवड करण्यात आली होती.पाच वर्षापूर्वी केलेल्या या लागवडीचा परिणाम दिसून येत आहे. आम्ही सध्या आंब्याच्या नव्या प्रजातीचा शोध घेत आहोत जेणेकरुन आंब्याच्या उत्तमोत्तम प्रकारांचं उत्पादन घेता येईल आणि लोकही या तंत्राचा उपयोग करू शकतील.

    या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रयोगासाठी निवडण्यात आलेलं हे झाड १० वर्षांचं आहे. देशी आंब्याच्या या झाडावर वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या झाडांच्या फांद्या कलम करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर या झाडाच्या देखभालीसाठी एक वेगळा अधिकारीही नियुक्त करण्यात आला होता. आता या झाडाच्या सगळ्या फांद्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे येत आहेत.