House Full sign outside Bangalore Cemetery

कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने बंगळुरूमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने 'हाऊस फुल'चे बोर्ड लावण्यात आले आहेत.

    बंगळुरू : कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने बंगळुरूमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने ‘हाऊस फुल’चे बोर्ड लावण्यात आले आहेत.

    बंगळुरूमधील चमराजपेट येथे टीआर मिल स्मशानभूमी आहे. या ठिकाणी ४५ मृतदेह आणण्यात आले. मात्र, एकाचवेळी २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शक्य आहे तर १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी आधीच नोंदणी झाली होती.

    दिवसभरात तेथील कर्मचाऱ्यांना ४५ मृतदेहांवर अंतिमसंस्कार करणे शक्य नव्हते. त्यामुळे स्मशानभूमीच्या बाहेर ‘हाऊस फुल’चा बोर्ड लावण्यात आला. यावेळी मृतांच्या नातेवाईकांची धावाधाव होताना दिसून आली.