बँक ग्राहकांच्या पैसा सुरक्षित ठेवणार कसा? कोर्टाचा आरबीआयला सवाल

काळा पैसा पांढरा करणाऱ्यांबाबत नव्हे तर गरीब प्रामाणिक नागरिकांचा जो पैसा बँकेत जमा होतो तो देशाच्या विकासावर खर्च केला जातो. सायबर गुन्हेगारीमुळे गरीबांचा पैसाही बँकेत सुरक्षित नाही. या ठेवींची हमी घ्यायला हवी. गरीबांचा लुटलेला पैसा कसा परत येणार हेसुद्धा निश्चित व्हायला हवे. ग्राहकांच्या ठेवी कशा सुरक्षित राहतील याची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

    प्रयागराज : प्रामाणिक व गरीब नागरिकांनी साठविलेल्या आयुष्यभराच्या ठेवी सायबर ठगांपासून कशा सुरक्षित ठेवता येईल, असा प्रश्न अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र, राज्य सरकार व रिझर्व्ह बँकेला विचारला आहे. सायबर ढग वाळवीप्रमाणे संपूर्ण देशाचे वाटोळे करीत देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत करीत आहे, अशी टीप्पणीही न्यायालयाने केली.

    ग्राहकांचे पैसे बुडू नये यासाठी जबाबदारी निश्चित व्हायला हवी आणि ती बँक व पोलिसांपर्यंत असावी, असेही कोर्टाने म्हटले. न्यायमूर्ती शेखरकुमार यादव यांनी नीरज मंडल ऊर्फ राकेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली.

    कोर्टाने एक लाखपेक्षा अधिक सायबर गुन्ह्याची माहिती न्यायालयाने पोलिस प्रशासनाला मागितली होती. परंतु अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर कोर्टाने असमाधान व्यक्त केले. या प्रकरणांवर बँक व पोलिस दोघेही गंभीर नसल्याची टीप्पणी न्यायालयाने केली. लोकांच्या आयुष्याच्या ठेवीवर डल्ला मारला जातो आणि हा प्रकार दूरवरील एका भागातून झाला आहे असे सांगत त्यांची बोळवण केली जाते, असा संतापही न्यायालयाने व्यक्त केला. नक्षलग्रस्त भागात जाण्यासही पोलिस घाबरतात त्यामुळे पैसे परत मिळविणे आव्हानच आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]