Human skull found in woman's bag while checking; Excitement at Madhya Pradesh airport

ही कवटी विसर्जनासाठी हरिद्वारला न्यायची होती, मात्र मला त्यास परवानगी मिळाली नाही, असे महिलेने सांगितले. यानंतर महिलेने आपल्या परिचिताला बोलावून त्याच्याकडे ही कवटी सोपविली आणि दुसऱ्या विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतली.

    इंदूर : देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून(Devi Ahilya Bai Holkar Airport) दिल्लीला जाणाऱ्या एका महिलेच्या बॅगमध्ये मानवी कवटी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

    ही कवटी विसर्जनासाठी हरिद्वारला न्यायची होती, मात्र मला त्यास परवानगी मिळाली नाही, असे महिलेने सांगितले. यानंतर महिलेने आपल्या परिचिताला बोलावून त्याच्याकडे ही कवटी सोपविली आणि दुसऱ्या विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतली.

    विमानतळ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रवासी महिलेचे नाव योगमाता सचदेवा असे आहे. त्या विस्तारा विमानाने दिल्लीला जाणार होत्या. मात्र, तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगमध्ये मानवी कवटी आढळून आली.