ओडिशातील बालकांना चक्रीवादळाचे नाव; वादळादरम्यान 750 बाळांचा जन्म

ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला. चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यांचे मोठे नुकसाना झाले. मात्र, याच चक्रीवादळादरम्यान ओडिशामध्ये 750 पेक्षा जास्त बाळांच्या जन्माची नोंद झाली. एवढेच नाही, तर चक्रीवादळाच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्या म्हणून पालकांनी यापैकी काही बालकांना चक्क चक्रीवादळाचे नाव दिले.

  भुवनेश्वर : ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला. चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यांचे मोठे नुकसाना झाले. मात्र, याच चक्रीवादळादरम्यान ओडिशामध्ये 750 पेक्षा जास्त बाळांच्या जन्माची नोंद झाली. एवढेच नाही, तर चक्रीवादळाच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्या म्हणून पालकांनी यापैकी काही बालकांना चक्क चक्रीवादळाचे नाव दिले.

  इंग्रजीमध्ये म्हणतात जास्मिन

  चक्रीवादळाची आठवण म्हणून आम्ही आमच्या मुलांचे नाव वादळाच्या नावावरून ठेवल्याचे या पालकांचे म्हणणे आहे. हे चक्रीवादळ ओमानमधून आले. यामुळे या चक्रीवादळाचे नामकरण ओमाननेच केले होते. चक्रीवादळाचे नाव पर्शियन भाषेत असून त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘जॅस्मिन’ असा आहे.

  वादळाच्या आठवणी स्मरणात राहाव्या म्हणून…

  ओडिशाच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ जेव्हा घोंगावत होते त्या काळात ओमानमध्ये 750 नवे मुला-मुलींचा जन्म झाला सरकारी आकडेवारी सांगते. अनेक पालकांनी आपल्या नवजात मुला-मुलीचे नाव चक्रीवादळावरून ठेवले आहे. यातील काही चिमुकले चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर दाखल झाले असताना जन्माला आली तर काही बालासोर जिल्हात 50 किमी दक्षिणेस असलेल्या बहानया येथे वादळ जमिनीवर धडकले तेव्हा जन्माला आली असे समजते. अनेकांनी हे वादळ कायम लक्षात राहील म्हणून बाळाचे नाव यास ठेवल्याचे सांगितले. चक्रीवादळादरम्यान बालासोर जिल्ह्यात 165 बालके जन्मली त्यातील 79 मुले आहेत तर 86 मुली आहेत.

  2004 मध्ये ‘त्सुनामी’ नामकरण

  26 डिसेंबर 2004 जपानमध्ये त्सुनामी आलेली होता. त्याचा फटका जपानसहित, कोरिया, भारत आणि इंडोनेशिया इतर आग्नेय देशांना बसला होता. त्या दरम्यान जन्मलेल्या अनेक मुलींची नावे त्सुनामी अशी ठेवण्यात आली होती. आता चक्रीवादळाच्या नावावरून अनेक मुलांचे नामकरण झाल्यानंतर त्या घटनेची आठवण ताजी झाली आहे.