man beating woman

पतीने अपमानकारक शब्द वापरून मारहाण(husband beating wife) केल्याचा आरोप अहमदाबादमधील(ahmadabad) महिलेने केला आहे. पतीने त्या महिलेला उद्देशून ‘जाडी, काळी आणि कुरूप’ असे शब्द वापरले असल्याचेही तिने म्हटले आहे.

  अहमदाबाद: अहमदाबादमध्ये(ahmadabad crime) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  इथल्या एका महिलेनं आपल्या पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार(domestic violence in ahmadabad) केली आहे. या तक्रारीत तिने जे सांगितलं आहे ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  पतीने अपमानकारक शब्द वापरून मारहाण केल्याचा आरोप अहमदाबादमधील महिलेने केला आहे. पतीने त्या महिलेला उद्देशून ‘जाडी, काळी आणि कुरूप’ असे शब्द वापरले असल्याचेही तिने म्हटले आहे.

  या महिलेचा विवाह २०१८ साली मुंबईत ग्रॅन्ट रोड इथं राहणाऱ्या एका व्यक्तीशी झाला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्यांनी तिला तिच्या दिसण्यावरून टोमणे मारायला सुरवात केली. (woman harassed over looks, files complaint)

  महिलेनं तिच्या तक्रारीत सांगितलं की, विवाहानंतर काही महिन्यांमध्ये सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरवात केली.हुंड्याची मागणी केली. महिलेच्या माहेरच्यांना पैसे देणं शक्य नसल्याचे पाहून सासरच्या लोकांनी मारहाण करायला सुरुवात केली

  महिलेने पुढे म्हटले की, पती सतत आपल्याला दिसण्यावरून टीका करायचा. तो म्हणायचा की माझी गर्लफ्रेंड सुंदर होती. मी जेव्हा कधी त्याला विरोध दर्शवायचे तेव्हा तो मला मारहाण करायचा. सासरचे लोकही त्यासाठी प्रोत्साहन द्यायचे.

  महिलेने तक्रारीत म्हटले की, सासरचे लोक मी अवलक्षणी आहे कारण मला भाऊ नाही, असे म्हणायचे. मलासुद्धा मुलगा होणार नाही, असेही म्हणायचे. तिनं मुलीला जन्म दिला तर वाईट परिणाम होतील अशी धमकीही दिली. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.