हुंड्यात गाडी मिळाली नाही म्हणून पतीने पत्नीला केली मारहाण,हातपाय बांधून डोक्यावरचे….

एका पतीनं हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीला (Beating To Wife) मारहाण केल्याचे समोर आले आहे.

    लखनऊ :उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बहराइचमध्ये(Bahraich) एक धक्कादायक घटना घडली आहे.एका पतीनं हुंड्यासाठी (Dowry) आपल्या पत्नीला (Beating To Wife) मारहाण केल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर पुढे त्यानं पत्नीचे हातपाय बांधले आणि तिचे डोक्याचे संपूर्ण केस काढून टाकले (Dowry Harassment). पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

    नेपाळचा रहिवासी असलेल्या अमजद अलीनं आपली मुलगी बसीरुन हिचं लग्न पाच वर्षापूर्वी बहराइच येथील मटेरा क्षेत्रातील समोखनचा रहिवासी असलेल्या साजिद साईंसोबत केलं होतं. असा आरोप आहे की साजिद सुरुवातीपासून हुंड्याची मागणी करत बायकोला त्रास देत होता. अमजद अलीनं सांगितलं की आरोपी एक लाख रूपये आणि दुचाकी मागत होता.

    अमजद अलीनं सांगितलं की मागण्या पूर्ण होत नसल्यानं त्यांच्या मुलीला मागच्या पाच वर्षांपासून सतत छळाचा सामना करावा लागत होता. अनेकदा समजूत काढून ते मुलीला तिच्या सासरी सोडून आले. मात्र, आता तिच्या पतीनं अमानुषपणाच्या साऱ्या हद्दीच पार केल्या. त्यांनी सांगितलं की आधी त्यांच्या मुलीला मारहाण करण्यात आली आणि नंतर तिचं मुंडन केलं.

    पीडितेनं सांगितलं की न्याय मागण्यासाठी ती पोलीस ठाण्यात गेली मात्र तिला न्याय मिळाला नाही. तिची तक्रार ऐकून घेण्याआधीच तिला आणि तिच्या वडिलांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिनं न्याय मागण्यासाठी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.