The husband nodded, not even taking a selfie; Strange excuses for wives to divorce

  सूरत : राजकीय मतभेदांमुळे गुजरातमधील सूरत येथे एका तरूण इंजिनिअर दांपत्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली. पत्नी आम आदमी पार्टीची (आप) नगरसेविका असून या जोडप्याने नुकताच एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. रुता दुधागरा आणि चिराग असे या दांपत्याचे नाव आहे.
  26 वर्षीय नगरसेविका रुता दुधागरा आता पति चिराग (28) यांच्यांकडून त्यांचे वैयक्तीक साहित्य, जसे शाळा आणि कॉलेजच्या मार्कशीट्स, काही महत्वाची कागदपत्रे, त्यांच्या नगरसेवकपदाशी संबंधित काही दस्तऐज, त्यांची मोपेड आणि लॅपटॉपसह इतर मौल्यवान साहित्य घेण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहेत.

  पतीला घटस्फोटासाठी दिले 7 लाख रुपये

  आयटी इंजिनिअरने सांगितले, की ‘माझे पती गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होते. यामुळे मी त्यांना 7 लाख रुपये दिले आणि त्यांनी माझे 90 ग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेले दागिने घेतले आहेत. रोख दिलेले पैसे सेपरेशनसाठी होते, असे मी मानते. मात्र, आता मी माझे दस्तऐवज घेण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहे.’

  ‘भाजप जॉइन करण्यासाठी टाकत होते दबाव’

  रुता म्हणाल्या, ‘माझे माझ्या पतीसोबत गेल्या एक वर्षापेक्षाही अधिक काळापासून मतभेद होते. मात्र, आम्ही अॅडजस्ट करत होतो. मात्र, माझ्या विजयानंतर काही आठवड्यांतच माझ्या पतीने माझ्यावर भाजपत सामील होण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यासाठी त्यांना कोट्यवधींचा प्रस्तावही भेटला आसेल. मात्र, मी आम आदमी पार्टी सोडणार नाही.’

  हे सुद्धा वाचा