कारसाठी पत्नीने माहेरून पैसे आणले नाही म्हणून पतीने केला ‘हा’ घृणास्पद प्रकार, बातमीने उडाली खळबळ

तीन महिन्यांपूर्वी ग्वाल्हेर येथील शशी नावाच्या मुलीशी वीरेंद्रचा विवाह(Marraige) झाला होता. आरोपी पती वीरेंद्र आपल्या पत्नीचा छळ करायचा. आरोपीनं कार खरेदी करण्यासाठी पत्नीनं माहेरून तीन लाख (Three Lakhs Demand For Car) रुपये आणावेत, यासाठी तगादा लावला होता.

    ग्वाल्हेर : एका पतीने आपल्या पत्नीने(Husband Harassed Wife) माहेरून कारसाठी पैसै आणले नाही म्हणून क्रूरतेच्या सर्व परिसीमा गाठल्या आहेत. आरोपी पतीनं पीडित तरुणीला अ‍ॅसिड पाजून(Acid Given To Drink Forcibly ) तिचा हत्येचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅसिडमुळे पीडित विवाहितेचा घसा आणि पोटातील आतडी जळली आहेत. दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून फरार आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे.

    वीरेंद्र जाटव असं आरोपी पतीचं नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी ग्वाल्हेर येथील शशी नावाच्या मुलीशी वीरेंद्रचा विवाह झाला होता. आरोपी पती वीरेंद्र आपल्या पत्नीचा छळ करायचा. आरोपीनं कार खरेदी करण्यासाठी पत्नीनं माहेरून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी तगादा लावला होता. पण पीडितेनं माहेरून पैसे आणण्यासाठी नकार दिला. दरम्यान २८ जून रोजी संतापलेल्या आरोपी पतीनं पत्नीला अ‍ॅसिड पाजलं. या दुर्दैवी घटनेत पत्नी शशी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचा घसा आणि पोटातील आतडी जळाली आहेत.

    पीडितेच्या आईने घटनेच्या पाच दिवसांनंतर आरोपी जावयाविरोधात ग्वाल्हेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पण घटना घडल्यानंतर जवळपास वीस दिवसांनी पोलीस तपासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि अ‍ॅसिड हल्ला अशी दोन महत्त्वाची कलमं देखील जोडली नव्हती.

    या घटनेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही कलमं लावल्याची माहिती मिळाली आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. यावेळी पीडित तरुणीनं तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिनं सांगितलं की, नवराचं आपल्याच वहिनीसोबत प्रेमसंबंध आहेत. २८ जून रोजी सकाळी दोघांनी मिळून आपल्याला अ‍ॅसिड पाजलं असल्याची माहितीही पीडितेनं दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याच्या वहिनीला अटक केली आहे. आरोपी पतीचा शोध सुरू आहे.