घरोघरी मातीच्या चुली…, बायकोनं बटाट्याची भाजी केल्यामुळे नवरा संतापला आणि रागाच्या भरात केलं असं काही…

बायकोने एक किलो बटाटे एका दिवसांत संपवल्याने नवरा (Husband)  संतापला होता. त्यानंतर त्याने बायकोला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत त्याची बायको जबर जखमी झाली असून तिला स्वरुपराणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या गंभीर प्रकरणानंतर मारकुट्या नवऱ्याला पोलिसांनी (Police Arrest) अटक केली आहे.

कांदा (Onion) असो वा बटाटा (Potato) कोरोनाच्या काळात भाज्यांचे दर (Vegetables Prices) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकं संतापली आहे. परंतु एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) समोर आली आहे. ती म्हणजे बायकोने एक किलो बटाटे एका दिवसांत संपवल्याने नवरा (Husband)  संतापला होता. त्यानंतर त्याने बायकोला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत त्याची बायको जबर जखमी झाली असून तिला स्वरुपराणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या गंभीर प्रकरणानंतर मारकुट्या नवऱ्याला पोलिसांनी (Police Arrest) अटक केली आहे. मात्र बायकोने केलेल्या विनंतीमुळे त्याला सोडून देण्यात आलंय.

कँट या भागात राहणारा किशन (Kishan) हा रिक्शाचालक (Auto Driver) आहे. शुक्रवारी किशन एक किलो बटाटे घेऊन घरी आला होता. बटाटे एका खोलीत ठेवून तो हातपाय धुवायला गेला होता. परंतु तो परत खोलीत आला तेव्हा त्याला एकही बटाटा शिल्लक नसल्याचं दिसलं. त्याने त्याच्या बायकोला विचारलं तेव्हा तिने बटाट्यांची भाजी केल्याचं सांगितलं. यामुळे किशन संतापला आणि त्याने सुनिताला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीमुळे ती बेशुद्ध झाली होती. शेजारच्यांनी मध्यस्थी केली असता किशनच्या बायकोला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर किशनला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

बायको म्हणजे नवऱ्याचा आधार…

किशन हा वाढत्या महागाईने त्रस्त होता. त्यातच सगळे बटाटे भाजीत घातल्याने तो संतापला होता आणि यामुळे त्याने आपल्या बायकोला मारहाण केल्याचं कँट पोलीस ठाण्याचे अधिकारी नीरज वालिया यांनी सांगितलं. परंतु किशनच्या बायकोने पोलिसांना सांगून आणि विनवनी करून त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडलं आहे.