नवरा बायकोचा क्षुल्लक कारणावरून दिवसभर झाला वाद, मग नवऱ्याने रात्री जे केलं ते पाहून सगळ्यांचीच झोप उडाली

पती आणि पत्नीमध्ये (Quarrel Between Husband and Wife) घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसान खुनात (Murder) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    चंदीगड: हरियाणातील (Haryana) बहादूरगडमध्ये पती आणि पत्नीमध्ये (Quarrel Between Husband and Wife) घरगुती कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसान खुनात (Murder) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आपल्या पत्नीच्या पोटात चाकूचे वार (Stabbed) करून फरार झालेल्या पतीचा पोलीस शोध घेत आहेत. रविवारी दिवसभर या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. हे भांडण वाढत गेलं आणि राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा खून केला.

    रिक्षाचालक योगेश आणि त्याची पत्नी संगीता हा दोघं बदाहूरगडच्या संत कॉलनी परिसरात राहणाऱ्या जोडप्यात रविवारी सकाळी एका घरगुती विषयावरून त्यांच्यात भांडण झालं. घरात त्यांची दहा वर्षांची मुलगीदेखील होती. मुलगी आतल्या खोलीत होती आणि बाहेरच्या खोलीत पती-पत्नीचं जोरदार भांडण सुरू होतं. भांडण विकोपाला गेलं. त्यानंतर रागच्या भरात पती योगेशनं पत्नीच्या पोटात चाकू खुपसला आणि घराच्या दाराला बाहेरून कडी लावून तो फरार झाला.

    विव्हळणाऱ्या आईचा आवाज ऐकून मुलगी बाहेर आली. खिडकीतून आरडाओरडा करून तिनं शेजाऱ्यांना दार उघडायला सांगितलं. दार उघडल्यानंतर जखमी संगिताला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तेव्हा संगिताचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

    पोलिसांनी संगिताच्या दहा वर्षांच्या मुलीची जबानी घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रिक्षाचालक असणाऱ्या योगेशला लवकरात लवकर शोधून काढू, असा दावा पोलिसांनी केला आहे.