कोशिंबीर वाढायला उशीर केला म्हणून त्याला राग आला, कुदळीने वार करत पतीने पत्नीची केली हत्या, घटनेमुळे उडाली खळबळ

जेवणात कोशिंबीर देण्यास उशीर केल्याने पतीने पत्नीचा जीव(Husband killed his wife) घेतला आहे. उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) जलालपूर गावात  ही घटना घडली आहे.

    रागाच्या भरात लोक अनेकदा वाईट कृत्य करुन जातात.उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली आहे. जेवणात कोशिंबीर देण्यास उशीर केल्याने पतीने पत्नीचा जीव घेतला आहे. उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) जलालपूर गावात  ही घटना घडली आहे. या (Crime)घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत.

    घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आरोपी मुरली सिंह घरी जेवत होता. त्याची पत्नी  वेगळ्या कामात गुंतली होती. त्यामुळे मुरली जेवत असताना त्याच्या ताटात पत्नीने कोशिंबीर उशिरा वाढली. कोशिंबीर उशीरा वाढल्यावरून मुरली सिंहला राग अनावर झाला.त्याने पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. तसेच हातातील कुदळीने पत्नीवर प्रहार केला. यात मुरलीची पत्नी सुदेशचा जागीच मृत्यू झाला. तसेच आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला २० वर्षीय मुलगा अजय गंभीर जखमी झाला आहे.

    शेजारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा सुदेश आणि तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते.शेजाऱ्यांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र पत्नी सुदेशचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी मुरली सिंह घटनास्थळाहून फरार झाला आहे.

    या प्रकरणी बाबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुरली विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम ३०२ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पत्नी सुदेश हिचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे.  मुलाची प्रकृती गंभीर आहे.आरोपीचा तपास सुरु आहे.