पत्नी माहेरी गेल्यावर पतीने गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार, बायकोनं सासरी येऊन जे केलं त्यामुळे नवरा झाला फरार

मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh) मुरैना जिल्ह्यातील दत्तपुरा येथील अनुराधा मौर्य हिचं लग्न(Marriage) २०१० साली धौलपुर जिल्ह्यातील कोतवाली ठाण्याच्या किरी मोहल्ला येथील रहिवासी वीरेंद्र सिंह याच्यासोबत झालं होतं. या दोघांना दोन मुलंही आहेत.

    जयपूर : राजस्थानमधील(Rajasthan) धौलपूर जिल्ह्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या पतीचं दुसरं लग्न (Married Man Ties Knot With Girlfriend) झाल्याचं समजताच एकच गोंधळ घातला आहे. विवाहित महिला आपल्या नातेवाईकांसोबत घरी पोहोचली असता सासरकडच्या मंडळींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या वडिलांना घरात बंद करून ठेवलं. याठिकाणी महिलेनं केलेला गोंधळ ऐकून आसपासचे लोकही जमा झाले.

    लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली. मात्र पोलीस याठिकाणी पोहोचण्याआधीच पती घरातून फरार झाला. पोलिसांनी महिलेला समजावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील दत्तपुरा येथील अनुराधा मौर्य हिचं लग्न २०१० साली धौलपुर जिल्ह्यातील कोतवाली ठाण्याच्या किरी मोहल्ला येथील रहिवासी वीरेंद्र सिंह याच्यासोबत झालं होतं. या दोघांना दोन मुलंही आहेत.

    अनुराधा आपल्या दोन मुलांसह २०१६ पासून माहेरी राहत आहे. कारण अनुराधाचा पती वीरेंद्र याचे पुजा उर्फ संगीता नावाच्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. तीन महिन्यांपूर्वी त्यानं पुजासोबत लग्नगाठ बांधली. याबाबत अनुराधाला माहिती होताच सोमवारी ती आपल्या नातेवाईकांसोबत सासरी पोहोचली .

    अनुराधाने घातलेला हा गोंधळ पाहून आजुबाजूचे लोकही जमा झाले. पोलिसांनी सांगितलं, की विरेंद्र आणि अनुराधा दोघंही पती-पत्नी आहेत.२०१०मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. दोघांमध्ये वाद झाले होते. अनुराधानं हुंडा आणि मेन्टेनन्स केस केली आहे आहे.