boiling water

एका माणसाने आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकल्याची(Husband Thrown Boiling Water On Wife) माहिती समोर आली आहे.

    लखनऊ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक भयानक घटना घडली आहे. शाहजहांपूर (Shahjahanpur) इथल्या एका माणसाने आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकल्याची(Husband Throws Boiling Water On Wife) माहिती समोर आली आहे. हे क्रूर कृत्य करण्यामागचे कारणही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला लगेगच रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आलं आहे. उकळतं पाणी तिच्या शरीरावर पडल्याने महिला जळाली असून तिची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

    शाहजहांपूर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं २०१३ मध्ये लग्न झालं असून तिला तीन मुली आहेत.एक वर्षापूर्वी तिसऱ्या मुलीचा जन्म झाला होता. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता. तो पत्नीचा वेगवेगळ्या प्रकाराने छळ करायचा. पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकण्यामागे मुलगा होत नसल्याचा राग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला अनेकदा तो जेवणही देत नसे. तसेच माहेरहून ५०००० रुपये आणण्यासाठीही नवरा दबावही आणत होता.

    पीडित महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.