मुलगा झाला नाही म्हणून पतीला आला राग,पत्नी आणि मुलीला विहीरीजवळ नेेऊन केलं भयानक कृत्य – सगळीकडे व्यक्त होतेय हळहळ

मुलगा होत नाही म्हणून संतापलेल्या एका पतीने (Husband Throws Wife and Daughter in Well) पत्नी आणि मुलींना विहिरीत फेकल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि सहा महिन्याची मुलगी यामध्ये वाचली असून एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

  समाज कितीही सुधारलेला असला तरी मुलगी नको मुलगाच हवा असा समज आजही अनेक जणांचा आहे. मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) छत्तरपूर इथेही अशीच काहीशी घटना घडली आहे. मुलगा होत नाही म्हणून संतापलेल्या एका पतीने (Husband Throws Wife and Daughter in Well) पत्नी आणि मुलींना विहिरीत फेकल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि सहा महिन्याची मुलगी यामध्ये वाचली असून एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी पती आपल्या पत्नीला माहेरुन घरी आणत असताना ही घटना घडली.

  घरी जाण्याऐवजी पती पत्नीला घेऊन एका विहिरीजवळ गेला. त्याने तिथे आपली गाडी पार्क केली आणि नंतर पत्नी आणि मुलींना विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यानतंर पत्नी आणि मुली मदत मागू लागल्या तेव्हा तो पळून गेला.

  विविध कारणांमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा चीन सरकारचा प्रयत्न योग्य आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  दरम्यान  महिला आपल्या एका मुलीला घेऊन विहिरीबाहेर आली, मात्र मोठ्या मुलीचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला.स्थानिकांच्या मदतीने महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या पतीविरोधात पोलीस तक्रार दिली.

  पती गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं तिने  पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीचा शोध सुरु केला आहे.