marriage

विवाहानंतर पत्नीला एका परपुरुषावर प्रेम जडलं, तर नवऱ्यानं थेट त्या दोघांचं लग्नच(wife`s second marriage by husband) लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

    भागलपूर : लग्नानंतर (marriage)नवऱ्याला किंवा बायकोला इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र  बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंजमध्ये पतीने जे केलं आहे ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

    विवाहानंतर पत्नीला एका परपुरुषावर प्रेम जडलं, तर नवऱ्यानं थेट त्या दोघांचं लग्नच लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाला ७ वर्षे झाल्यानंतर दोन मुलांच्या आईला दुसरा पुरुष आवडू लागला. जेव्हा ही गोष्ट तिच्या नवऱ्याला समजली, तेव्हा त्यानं पोटच्या मुलांचाही विचार न करता पत्नीचं त्या परपुरुषाबरोबर लग्न लावून दिलं.

    बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील सपना कुमारी या महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंजमधील उत्तम मंडल यांच्याशी लग्न झालं होतं. विवाहानंतर सुरुवातीला त्यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र कालांतरानं विवाहितेला एका परपुरुषावर प्रेम जडले. त्या तरुणाची विवाहितेची जवळीक वाढत गेली आणि ही गोष्ट पतीला समजली.

    पत्नीचं एका परपुरुषासोबत प्रेम असल्याचं समजल्यानंतर पती चांगलाच संतापला.  तिच्या या प्रेमसंबंधाला कडाडून विरोध केला. त्या तरुणामुळे पती-पत्नीमध्ये बरेच कलहही निर्माण झाले. पण पत्नी सपना काही थांबण्याचं नाव घेत नव्हती, तिनं त्या तरुणाबरोबर आपले संबंध सुरूच ठेवले.  पत्नीच्या जिद्दीपुढे अखेर पतीनं हार स्वीकारली आणि दोघांचे लग्न लावून दिले. पत्नीनं राजू कुमार नावाच्या पत्नीच्या प्रियकरासोबत तिचे लग्न लावून दिलं.

    सुल्तानगंजमधील दुर्गा मंदिरात दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत हे लग्न झालं. यावेळी संबंधित महिलेची दोन मुलंसुद्धा लग्नात हजर होती. पत्नीचं परपुरुषाबरोबर लग्न होत असल्याचं पाहताना पतीचेही डोळे पाण्यानं भरले.