Worship of the witch began to summon the soul; The body was lying in the house for 20 days Shocking type in Tamil Nadu

    मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये अपत्यप्राप्तीसाठी एका पतीने केलेलं संतापजनक कृत्य समोर आले आहे. पतीने आपल्याच पत्नीला तांत्रिकाच्या हवाली केले. तंत्र-मंत्राच्या नावावर तांत्रिकाने मित्राच्या पत्नीसोबत रेप केला. ज्यानंतर पती आणि तांत्रिकाद्वारे अत्याचार करण्यात आलेल्या महिलेन पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही तुरूंगात पाठवले.

    मेरठमधील फैयाज अली भागातील ही घटना आहे. येथे 2 वर्षांआधी ताहिरचा निकाह झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतरही अपत्य होत नसल्याने ताहिर आणि त्याच्या पत्नीत सतत भांडण-वाद होत होते. ताहिरने त्याचा मित्र इस्माइल याला याबाबत सांगितले. इस्माइल हा एक तांत्रिक आहे. त्यामुळे ताहिर तांत्रिकाच्या मदतीने अपत्यप्राप्तीचे स्वप्न बघू लागला होता. अपत्य प्राप्तीचे स्वप्न दाखवून ताहिरने पत्नीलाही तांत्रिकाकडे जाण्यासाठी तयार केले. ज्यानंतर तांत्रिकाने त्याच्याच घरात तंत्र-मंत्राचा ड्रामा करणे सुरू केले.

    पीडित महिलेने आरोप केला की, तांत्रिकाने तंत्र-मंत्राच्या नावाखाली तिच्यावर रेप केला. रेप होत असताना महिलेने पतीला मदतीसाठी हाक मारली. मात्र, निर्लज्ज पती तिच्यासोबत होत असलेले सगळे बघत राहिला. तांत्रिकाच्या या संतापजनक कृत्यात महिलेच्या पतीचीही सहमती होती. ज्यामुळे महिलेने दोघांविरोधातही पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर घटनेचे सत्य समोर आले. दोघांनाही अटक करून तुरूंगात डांबण्यात आले आहे.

    हे सुद्धा वाचा