Hyderabad A horrific explosion at a chemical company; 8 workers seriously injured

हैदराबाद : हैदराबाद शहराबाहेर असलेल्या औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या परिसरातील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात  ८ कामगार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

शनिवारी बोल्लम येथील एका केमिकल फॅक्टरीत दुपारी हा स्फोट झाला. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी काही कर्मचारी फॅक्टरीत अडकल्याची भिती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

स्फोटानंतर संपूर्ण फॅक्टरीतून मोठ्याप्रमाणावर धूर बाहेर पडत होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब पोहचले व आग विझवण्याचे काम सुरू झाले. धुराचे लोट पाहून स्थानिकांमध्ये घबराहट पसरली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.