तलावात ५०० च्या नोटा तरंगताना दिसल्या, नंतर झालं काय झालं ? : वाचा सविस्तर

अजमेर जिल्ह्यात आनासनगरमधील एका तलावात ५०० रुपयांच्या नोटा तरंगताना आढळून आल्या. आनासनगरच्या रामप्रसाद घाटावर घडली आहे. येथील तलावात कोणीतरी पैश्यांनी भरलेली बॅग फेकली होती. यानंतर गावभर पैश्यांचा पाऊस पडला असून तलावात नोटा तरंगत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. ही गोष्ट समजताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.

    जयपूर : पैसा म्हटलं की भले-भले लालची होतात. अशातच राजस्थान येथील अजमेर जिल्ह्यात आनासनगरमधील एका तलावात ५०० रुपयांच्या नोटा तरंगताना आढळून आल्या. मात्र यानंतर जे झालं त्याने हसावं की रडावं हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

    दरम्यान या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच गोंधळ आहे. ही घटना रविवारी आनासनगरच्या रामप्रसाद घाटावर घडली आहे. येथील तलावात कोणीतरी पैश्यांनी भरलेली बॅग फेकली होती. यानंतर गावभर पैश्यांचा पाऊस पडला असून तलावात नोटा तरंगत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. ही गोष्ट समजताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.

    तसेचं अनेक गावकऱ्यांनी थेट तलावात उडी मारुन पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. लोकांना नोटा लुटताना बघितल्यावर तलावाच्या सुरक्षा रक्षकांनी देखील तलावात उडी मारली. एवढंच काय तर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनीही बोट घेऊन नोटा लुटण्यास सुरुवात केली. या संपुर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.

    दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी काठीचा धाक दाखवून सर्वांना तेथून पळवून लावलं. यादरम्यान, अनेकांना २०० च्या तर काहींना ५०० च्या नोटा हाती लागल्या. मात्र ही बॅग तलावात कोणी फेकली याचा अद्याप शोध लागला नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.