शारीरिक संबंध ठेवायचे आहे, सांगत अल्पवयीन मुलीवर ०७ जणांकडून अत्याचार

आम्हाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. हे ऐकून पीडित मुलीनं पळायला सुरुवात केली. पण आरोपी मित्राच्या अन्य सहा साथीदारांनी तिला पकडलं. यानंतर सातही आरोपीनं ..............

  रांची (Ranchi) : प्रेमाच्या नावाआड फिरायला जायचे नाटक करून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (13 year old girl) मित्राने अन्य ०७ जणांच्या मदतीने सामूहिक बलात्कार (gang rape) केला. झारखंड राज्यातील (Jharkhand state) रांची जिल्ह्यातील (Ranchi district) एका गावात ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, आरोपी मित्राने (the accused friend) अत्याचारानंतर मुलीला तिच्या मैत्रिणीच्या घरीही सोडले. यानंतर तो गायब झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

  संबंधित घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील रांची (Ranchi) येथील एका गावातील आहे. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, तिने गुरुवारी गावातील एका मित्रासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता. या प्लॅननुसार ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला गेली. पण तिच्या मित्रानं तिला एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं. जिथे आरोपी मित्राचे अन्य सहा मित्र आधीपासूनच उपस्थित होते. याठिकाणी गेल्यानंतर पीडित मुलगी घाबरली. तिने आपल्या मित्राला त्वरित घरी सोडायला सांगितलं. पण मित्रानं तिला रोखून ठेवलं.

  तिने घरी जाण्यासाठी आपल्या मित्राकडे अनेकदा विनंती केली. पण मित्रानं काही ऐकलं नाही. यावेळी मित्रानं म्हटलं की, आम्हाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. हे ऐकून पीडित मुलीनं पळायला सुरुवात केली. पण आरोपी मित्राच्या अन्य सहा साथीदारांनी तिला पकडलं. यानंतर सातही आरोपीनं संपूर्ण रात्रभर 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केला आहे. यानंतर आरोपींनी रात्री उशीरा पीडित मुलीला तिच्या एका मैत्रिणीच्या घरी सोडलं आणि पळ काढला.

  मैत्रिणीच्या घरी संपूर्ण रात्र घालवल्यानंतर पीडित मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी गेली. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. यानुसार नातेवाईकांनी मांडर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  संबंधित सर्व आरोपी सरासरी 16 वर्षांचे आहेत. अद्याप तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संबंधित सर्व आरोपी पीडित मुलीच्या ओळखीतले असून सर्वांनी नियोजन आखून हा सामूहिक बलात्कार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

  याप्रकरणी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. रांची पोलिस विभाग (The Ranchi Police Department) इतर तीन आरोपींचा कसून शोध घेत आहेत. एखाद्या मित्रावर अंधपणानं विश्वास ठेवणं (blindly trust a friend) किती धोकादायक ठरू शकतं, याचा प्रत्यय नुकताच एका धक्कादायक घटनेत आला आहे.