भाजप हायकमांडकडून आदेश मिळताच माझ्या पदाचा राजीनामा देईल- मुख्यमंत्री बीएएस येडियुरप्पा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांना आता स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि महसूल मंत्री आर अशोक यांनी पूर्णविराम दिला आहे.

    बंगळुरू: ‘आजच्या घडीला तरी राज्यात नेतृत्वबदलासाठी कोणी पर्याय आहे, असं मला वाटत नाही. ज्या दिवशी भाजपच्या हायकमांडकडून मला आदेश मिळतील त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल.’ असं वक्तव्य करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएएस येडियुरप्पा यांनी राज्यातील नेतृत्व बदलाबाबतच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

    याबरोबरच ‘बीएस येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि तेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. त्यामुळे राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा आता थांबवायला हव्यात’. अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री आर अशोक यांनी व्यक्त केली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांना आता स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि महसूल मंत्री आर अशोक यांनी पूर्णविराम दिला आहे.

    हे सुद्धा वाचा

    येडियुरप्पा यांच्या राजकीय खेळीमुळे कर्नाटकमधील जेडी(एस) व काँग्रेसने एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार कोसळले. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप सरकार स्थापन करण्यात आलं