राज्यात आपलं सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री कोण असणार? दिलीप घोष यांनी दिले संकेत

भाजपला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याचा दावा करत घोष मंगळवारी म्हणाले, की राज्यात पुढील सरकार भाजपचंच असेल. ते म्हणाले, की अशा परिस्थितीमध्ये हे गरजेचं नाही की नवनिर्वाचित आमदारानंच मुख्यमंत्री व्हावं. मेदिनीपूरचे खासदार घोष यांनी दावा केला, की पक्षाच्या बाजूनं असणारी मजबूत लाट शेवटच्या टप्प्यापर्यंत अशीच राहिल.

    कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी पार पडणार आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी मुख्यमंत्री पदासाठीच्या चेहऱ्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं राज्यात आपलं सरकार स्थापन (BJP in West Bengal) झाल्यास मुख्यमंत्री कोण असणार याबाबतचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी म्हटलं.

    भाजपला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याचा दावा करत घोष मंगळवारी म्हणाले, की राज्यात पुढील सरकार भाजपचंच असेल. ते म्हणाले, की अशा परिस्थितीमध्ये हे गरजेचं नाही की नवनिर्वाचित आमदारानंच मुख्यमंत्री व्हावं. मेदिनीपूरचे खासदार घोष यांनी दावा केला, की पक्षाच्या बाजूनं असणारी मजबूत लाट शेवटच्या टप्प्यापर्यंत अशीच राहिल.

    घोष म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर केवळ भाजपलाच आपल्या विजयाबाबत विश्वास आहे. तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे नेते हताश झाले आहेत. जसं जसं पुढच्या टप्प्यातील मतदान सुरू होईल, तसं भाजपसाठी राज्यातील वातावरण आणखी मजबूत होत जाईल आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पराभवाची जाणीव होईल.