बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ ठोकला तर… बलात्काऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहे आणि एन्काऊंटरसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक पॅटर्न बनत आहे का?, मी त्यांना हे पोलिसिंग पॅटर्न असायला हवे, असे सांगितले. बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ ठोकला आणि पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल.

    दिसपूर : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोरपणे कारवाई केली जावी, असे निर्देश त्यांनी पोलिस विभागाला दिले आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी सर्व पोलिस स्थानकांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

    काही लोकांनी मला सांगितले की, आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहे आणि एन्काऊंटरसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक पॅटर्न बनत आहे का?, मी त्यांना हे पोलिसिंग पॅटर्न असायला हवे, असे सांगितले. बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ ठोकला आणि पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल.

    परंतु छातीवर नाही आणि कायद्याने म्हटले आहे, तुम्ही पायावर गोळी मारू शकता. आसाम पोलिसांची देशात सर्वोत्कृष्ट पोलिस म्हणून गणना व्हावी, अशी माझी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. गाय आमची माता आहे. ती आम्हाला दुध देते. ट्रॅक्टर येण्यापूर्वी आम्ही गायीच्याच मदतीने शेती करीत होतो आणि आजही ते प्रकार अनेक राज्यांमध्ये सुरू आहेत. परंतु आता लोक पशूंची तस्करी, अंमली पदार्थांच्या तस्करीतही सामील झाले आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.