मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर आपल्या पराभवावर आत्म-मंथन कसे करणार?; काँग्रेस नेत्यांचं ट्विट

काँग्रेसच्या अडचणी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत. आसाम, केरळ, पदुचेरीतील तथा बंगालमधील पराभव केवळ काँग्रेसच नाही, तर राहुल गांधींनाही मोठा झटका आहे.

    नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करवा लागत आहे. या वेळी काँग्रेसला चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यातही विशेषतः आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसला मोठी आशा होती. मात्र, आलेले निकाल पाहता काँग्रेसच्या अडचणी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत. आसाम, केरळ, पदुचेरीतील तथा बंगालमधील पराभव केवळ काँग्रेसच नाही, तर राहुल गांधींनाही मोठा झटका आहे.

    यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रवक्ता रागिनी नायक यांनीही एक ट्विट करत पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, ”जर आपण (काँग्रेसी) मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर आपल्या पराभवावर आत्म-मंथन कसे करणार?”

    माजी काँग्रेस नेते संजय झा यांनीही पक्षाचे प्रदर्शन आणि निवडणूक निकालांसंदर्भात पक्षाच्या भूमिकेवर निराशा व्यक्त केली आहे. झा यांनी ट्विट करत म्हटले आहे, ”माझ्यासाठी सर्वात मोठी निराशा, काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये आत्मसमर्पण आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. काँग्रेस 2016 मध्ये, 44 जागा आणि 12.25 टक्के मतांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष होता.

    याच बरोबर, वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे, की ”मला आश्चर्य वाटते, की काँग्रेस भाजपला हरवल्याबद्दल कधीपर्यंत इतरांचेच अभिनंदन करत राहणार…?”

    पुन्हा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ?

    खरे तर रविवारी आलेल्या चार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे राहुल गांधी आणि काँग्रेससाठी मोठा झटका आहे. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट गटातील नेते काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. केरळमध्येही काँग्रेसला व्यवस्थित पणे एका छताखाली आणण्यास राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत. त्याचाही पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूलला बहुमतात आल्याने, आता येणाऱ्या दिवसांत राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांच्या नेतृत्वात त्यांची दावेदारीही वाढेल. मात्र, राष्ट्रीय स्थरावर काँग्रेसच भाजपला एकमेव पर्याय आहे, असे काँग्रेच्या नेतृत्वाला वाटते. मात्र, आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.