नोटीस पीरियड पूर्ण होण्याआधीच जॉब सोडाल तर… कॉन्ट्रॅक्ट लेटरमधील अटीची कडक अंमलबजावणी होणार

अहमदाबाद : नोटीस पीरियड पूर्ण होण्याआधीच जॉब सोडणाऱ्यांवर मोठा आर्थिक फटका बसू शकतो. नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर कर्मचाऱ्यांना १८ टक्के GST भरावा लागणार आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याला अपॉन्ट्मेंट लेटर किंवा कॉन्ट्रॅक्ट लेटरनुसार घालून दिलेला नोटीस पिरियड पूर्ण करणं कायद्यानुसार गरजेचं आहे. आता या नियामाची कडक अंमलबजावणी होणार आहे.

नव्या नियमांनुसार, नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर कर्मचाऱ्याला आपल्या फुल अॅन्ड फायनलच्या रकमेतून १८ टक्के जीएसटी भरावा लागू शकतो. या संबंधी गुजराज अथॉरिटी ऑफ एडव्हान्स रुलिंगने हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण अहमादाबादेतील एका प्रकरणाशी संबंधित आहे.

येथील एका एक्सपोर्ट कंपनीत कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याने अॅडव्हान्स रुलिंगचे दार ठोठावले आहे. आपण सध्या काम करत असलेली सोडू इच्छितो आणि तीन महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करु इच्छित नाही, असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.
नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर तुम्हाला 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याची सूचना अॅडव्हान्स रुलिंगने केली आहे.