पगार पाहिजे असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

बिहारमध्ये आरोग्ययंत्रणा व्हेटिंलेटरवर असून मृत्यूदरातही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अहमदाबाद येथून रेमडेसिविर इंजेक्शनाची मागणी केली होती.

    पाटणा : बिहारमध्ये आरोग्ययंत्रणा व्हेटिंलेटरवर असून मृत्यूदरातही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अहमदाबाद येथून रेमडेसिविर इंजेक्शनाची मागणी केली होती.

    बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी याबाबतची प्रशासकीय तयारी केली आहे. बिहारमध्ये दररोज १२ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. लशीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

    बिहारमध्ये सध्या एका पत्राची चर्चा आहे. ‘पगार हवा असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या,’ असे पत्र गया आणि बेगुसरायच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लिहिले आहे. सध्या या पत्राची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करा, पूर्ण पगार घ्या,’ असे पत्रात नमूद केले आहे.

    यासाठी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. गयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी हे पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना पूर्वसूचना दिली होती, असे सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे.