Taslima Nasreen

लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये इमाम आणि तेथील शिक्षक मुलांवर दररोज बलात्कार (Imams rape children) करतात. ते आल्लाहाच्या (Allah) नावावर बलात्कार करत असतील असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली : बांगलादेशामध्ये मशिदी आणि मदरशांमध्ये रोज लहान मुलांवर बलात्कार (Imams rape children) होत असल्याचा आरोप  आणि खुलासा लेखिका तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen) यांनी केला आहे. लेखिका तस्लीमा नसरीन आपल्या वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त लिखाणासाठी चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा ट्विटरवरच्या माध्यमातून मुस्लिम धर्मावर टीका केली आहे.(Imams rape children in mosques and madrassas every day)

लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये इमाम आणि तेथील शिक्षक मुलांवर दररोज बलात्कार करतात. ते आल्लाहाच्या नावावर बलात्कार करत असतील असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना माहिती आहे की, आल्लाहा दयावान आहे. त्यांनी दिवसातून ५ वेळा नमाज पठण केल्यावर अल्लाह त्यांचा चूका माफ करेल. असे तसलीमा नसरीन यांनी म्हटले आहे.

लेखिका तस्लीमा नसरीन या नेहमी धर्मांच्या ढोंगीपणाविरोधात वक्तव्ये करत असतात. त्यामुळे त्यांची वक्तव्ये नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या धर्मविरोधी वक्तव्यांमुळे कट्टरपंथीयांकडून वेळोवेळी लक्ष्य केले जाते. त्यांना अनेकवेळा हत्येच्या धमक्या आल्या आहेत. म्हणून त्यांना बांगलादेशातून निर्वासित व्हाले लागले आहे. तस्लीमा नसरीन आता भारतात राहत आहेत. त्यांनी गायक ए आर रेहमान याच्यावर वक्तव्य केले होते. ए आर रेहमानच्या मुलीने बुरखा परिधान केला होता. यावरुन लेखिकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती.