केंद्रीय पेन्शनर्सबाबत महत्वाची बातमी, आता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार अपडेट : जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने पेन्शनबाबत आवश्यक अपडेट दिली आहेत. मोदी सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन देणाऱ्या बँकांना पेन्शनधारकांच्या पेन्शन स्लिप्स त्यांच्या मोबाइल नंबरवर एसएमएस व ईमेलद्वारे पाठविण्यास सांगितले आहे. यासाठी बँकांनी पेन्शनधारकांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरा. केंद्र सरकारच्या 62 लाख पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पेन्शन स्लिपसाठी त्यांना विभागाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

    नवी दिल्‍ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने पेन्शनबाबत आवश्यक अपडेट दिली आहेत. मोदी सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन देणाऱ्या बँकांना पेन्शनधारकांच्या पेन्शन स्लिप्स त्यांच्या मोबाइल नंबरवर एसएमएस व ईमेलद्वारे पाठविण्यास सांगितले आहे.

    दरम्यान यासाठी बँकांनी पेन्शनधारकांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरा. केंद्र सरकारच्या 62 लाख पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पेन्शन स्लिपसाठी त्यांना विभागाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

    काय आहे ऑर्डरमध्ये?

    सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने नुकताच पेन्शन वितरित बँकांच्या सेंट्रलाइज्ड पेन्शन प्रोसेसिंग सेंटर (सीपीपीसी) सह झालेल्या बैठकीत हा आदेश दिला आहे. या सेवेला कल्याणकारी उपक्रम म्हणून बँकांनी विचारात घ्यावे, असा आग्रह केंद्र सरकारने धरला. कारण ते फार महत्वाचे आहे. आयकर, महागाई सवलत, डीआर थकबाकी संबंधित कामात वेतन स्लिप आवश्यक आहे.

    सरकारने पेन्शनधारकांच्या ईज ऑफ लिव्हिंग(Ease of Living) अंतर्गत ही सेवा देण्याचे म्हटले आहे. या कामात व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया टूल्सचीही मदत घेता येईल, असे बँकांना सांगण्यात आले आहे. ऑर्डरनुसार, पेन्शन बँकेच्या पेन्शनधारकाच्या खात्यात जमा झाल्यानंतर ते एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविले जाऊ शकते. पेन्शनधारकाचा मोबाईल नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर असल्यास आपण त्यावर पेन्शन स्लिपही पाठवू शकता.

    तसेचं पेन्शन स्लिपमध्ये मासिक पेन्शनची संपूर्ण माहिती असावी. जर कोणताही कर वजा केला जात असेल तर तो स्लिपमध्येही द्यावा. तसेच पेन्शन खात्यात किती रक्कम पाठविली गेली, तेदेखील द्यावे. केंद्र सरकारच्या पेन्शनरला सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ताही पेंशनमध्ये मिळतो.